माळेगाव निकाल : विजय लकडे
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील मतमोजणीने आता वेग पकडला असून महिला राखीव गटात अत्यंत चुरशीची लढत रंगली आहे. निळकंठेश्वर पॅनलच्या संगीता कोकरे आणि सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या राजश्री कोकरे यांच्यात सध्या आघाडीची टक्कर सुरू असून या गटात जोरदार ‘टफ फाईट’ पाहायला मिळत आहे.
या गटातील मते मोजली जात असताना मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग झाल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे अंतिम निकालाबाबत साशंकता निर्माण झाली असून ही लढत शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात रतनकुमार भोसले तर इतर मागास प्रवर्गात नितीन शेंडे आघाडीवर आहेत. महिला राखीव गटात सध्या संगीता कोकरे आणि राजश्री कोकरे आघाडीवर असून निळकंठेश्वरच्या ज्योती मुलमुले तिसऱ्या, तर सहकार बचावच्या सुमन गावडे चौथ्या स्थानी आहेत.
निवडणूक निकालाचा पुढील कल बदलू शकतो, त्यामुळे महिला राखीव गटातील अंतिम निकाल सर्वांच्या उत्कंठेचा विषय ठरला आहे.
0 Comments